दैनंदिन आहारात ‘या’ भाज्या शिजवल्यावर होतात अधिक पौष्टिक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑक्टोबर ।। दैनंदिन आहारात भाज्या समाविष्ट करणे चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे असतात. भाज्या कच्च्या खाल्ल्याने जास्त फायदा होतो की शिजवून खाल्ल्याने, हा मुद्दा नेहमीच चर्चेचा असतो. बहुतेक भाज्या शिजवून खाल्ल्या जातात. तसेच, काही भाज्यादेखील आहेत, ज्या सलाड म्हणून वापरल्या जातात, म्हणजेच कच्च्या खाल्ल्या जातात. काहींच्या मते, भाज्या शिजवणे हा त्यातील पोषक तत्त्वे मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तर काहींच्या मते, कच्च्या भाज्या खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, कच्च्या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात; पण जेव्हा तुम्ही या भाज्या शिजवता तेव्हा त्यातून व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची थोडीशी मात्रा कमी होते. तेव्हा जीवनसत्त्वेही कमी होतात. तर बर्‍याच लोकांना कच्च्या भाज्या खाल्ल्याने सूज येणे, जडपणा आणि गॅस होऊ शकतो. त्यामुळे कच्च्या भाज्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे अवघड आहे. मात्र काही भाज्या अशा आहेत, ज्यांचे पोषण मूल्य शिजवल्यावर अधिक वाढते. अशा भाज्यांची ही माहिती…

पालक
पालेभाजी पालकामध्ये भरपूर पोषक घटक असतात. ही भाजी शिजवून खाल्ल्यास जास्त कॅल्शियम आणि लोह मिळू शकते. कारण पालकमध्ये ऑक्सॅलिक अ‍ॅसिड असते, जे लोह आणि कॅल्शियमचे शोषण रोखते. पण, शिजवल्यानंतर भाजीतून जास्तीत जास्त पोषक तत्त्वे मिळू शकतात.

टोमॅटो
बॅस्टिर युनिव्हर्सिटीच्या पोषण आणि व्यायाम विज्ञान विभागाच्या मते, टोमॅटो शिजवून खाल्ल्यास त्यातून व्हिटॅमिन ‘सी’चे प्रमाण कमी होते. मात्र, 2002 मध्ये जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, शिजवलेल्या टोमॅटोमध्ये कच्च्या टोमॅटोपेक्षा लाइकोपीनची पातळी लक्षणीयरीत्या जास्त असते.

मशरूम
मशरूममध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. कच्च्या मशरूमपेक्षा शिजवलेल्या मशरूममध्ये पोटॅशियम, नियासिन आणि झिंकचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मशरूम नीट शिजवून खाणे लाभदायक ठरते.

गाजर
गाजरामध्ये कॅरोटीनॉइड बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, ज्याचे शरीर व्हिटॅमिन ‘ए’मध्ये रूपांतरित करते. हाडांच्या वाढीस मदत करण्यात, द़ृष्टी वाढविण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या स्थितीत ठेवण्यात गाजर महत्त्वाची भूमिका बजावते. गाजर शिजवून खाल्ल्यास अधिक लाभ मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *