महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर योगेश योगेश बहल यांची काल निवड करण्यात आली असून पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. अजितदादा पवार यांनी काल पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर सर्वांनूमते शहराध्यक्षपदी योगेश बहल यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. योगेश बहल राष्ट्रवादीचे निष्ठावंत व अजितदादा यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद भूषविलेले आहे.
उशिरा का होईना पण अखेर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहराध्यक्ष मिळाला हे नक्की.
योगेश बहल यांचा अनुभव व जनसंपर्क दांडगा आहे. विधान सभेच्या या रणसंग्रामात त्यांचा अनुभव व जनसंपर्क पक्षाला फायदेशिर ठरेल असे ही बोलले जाते.