Indian Oil Job: सरकारी नोकरी; इंडियन ऑइलमध्ये भरती सुरु; मिळणार १६०००० रुपये पगार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑक्टोबर ।। इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ऑफिसर होण्याची चांगली संधी आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ज्या उमेदवारांकडे ग्रॅज्युएट डिग्री किंवा लॉमध्ये ग्रॅज्युएट डिग्री असणे गरजेचे आहे. याचसोबत ५ वर्षांच्या LLB डिग्री असायला हवी. इंडियन ऑइलच्या या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर २०२४ होती. ही तारीख आता वाढवून १८ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली आहे. (Indian Oil Job)

लॉ ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असावी. या नोकरीसाठी १२ जागा रिक्त आहे.IOCL भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असायला हवा. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड CLAT 2024 स्कोर, ग्रुप डिस्कशन, ग्रुप टास्क, मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. लॉ ऑफिसर पदासाठी उमेदवारांनी ५०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे.

इंडियन ऑइलमध्ये या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. तुम्ही आवश्यक कागदपत्रे सबमिट करुन फॉर्म भरु शकतात. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Indian Oil Recruitment)

सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्येही नोकरीची चांगली संधी आहे. टाटा इन्स्टिट्यूटमध्ये अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. बी कॉम ते हॉटेल मॅनेजमेंट पदवी प्राप्त उमेदवार विविध पदांसाठी अर्ज करु शकतात. टिआरएफच्या अधिकृत वेबसाइवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *