महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑक्टोबर ।।
रविंद्र आप्पा भेगडे यांच्या उपस्थितीत कान्हे येथे होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न!
श्री मोरया मित्र मंडळा व सौ.संजनाताई सातकर यांच्या तर्फे यशस्वी आयोजन.
कान्हे येथील श्री मोरया मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ व सौ. संजनाताई गुलाबराव सातकर यांच्या वतीने आयोजित , होम मिनिस्टर कार्यक्रमास मावळ भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी उपस्थित राहत , सहभागी महिला स्पर्धकांचा उत्साह वाढविला.
दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी कान्हे येथील श्री मोरया मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ शारदीय नवरात्र साजरी करत असते. महिलांच्या दैनंदिन कामांतून विरंगुळा मिळावा या उद्देशाने या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी , भावना व्यक्त करताना , रविंद्र भेगडे म्हणाले , “नवरात्र हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे , त्यामागे एक पौराणिक कथा आहे, ज्यामध्ये “महिषासुर” या राक्षसाला भगवान ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की तो कोणत्याही मनुष्य किंवा देवाकडून मारला जाणार नाही. या वरदानानंतर या राक्षसाने खूप संहार केला. त्यामुळे माता दुर्गेचे युद्ध झाले आणि हे युद्ध दहा दिवस चालले आणि दहाव्या दिवशी मातेने त्या राक्षसाचा वध केला ज्याला विजयादशमी म्हणतात , मावळ विधानसभेत देखील गुंडगिरी , दडपशाही , एकाधिकारशाही या महिषासुर प्रवृत्तींनी उच्छाद मांडला आहे. त्याचा बिमोड करण्याची ताकद तुमच्या मधील माँ दुर्गे मध्ये आहे. आपल्याला भयमुक्त मावळासाठी यंदा परिवर्तनाचा कौल आई जगदंबेकडे मागायचा आहे. ”
याप्रसंगी , सौ.सविताताई गावडे मा.जि. प. सदस्य, सौ.राणीताई म्हाळस्कर सरचिटणीस मावळ भाजपा,सौ. सुवर्णाताई घोटकुले लोकनियुक्त सरपंच आढले बु।।, श्री. विजय टाकवे अध्यक्ष मा.ता.बैलगाडा संघटना,
श्री.मदनजी शेडगे उपतालुका प्रमुख शिवसेना UBT, श्री. विजयजी शेडगे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती ,श्री.गुलाबराव सातकर कामगार नेते, संदीप शेडगे, रोशन शेडगे, विशाल शेडगे, काळूराम शेडगे आदींसह, पदाधिकारी , कार्यकर्ते आणि कान्हे ग्रामस्थ , महिला , भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते