महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑक्टोबर ।। भारत सरकारने नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे नागरिकांना कमी दरात जीवनावश्यक वस्तू देणे. रेशन कार्डावर या वस्तू नागरिकांना दिल्या जातात. रेशन कार्डावर आतापर्यंत तांदूळ, डाळ, तेल अशा अनेक गोष्टी स्वस्त किंमतीत दिल्या जात होत्या. आता रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
रेशन कार्डधारकांना आतापर्यंत मोफत तांदूळ दिले जायचे. मात्र, आता तांदूळ दिले जाणार नाही. सरकारने मोफत तांदूळ देण्याची सुविधा बंद केली आहे.
देशातील ९० कोटी लोक कमी किंमतीत रेशन खरेदी करतात. परंतु आता रेशन कार्डवर मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे.त्यामुळे आता नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याद्वारे नागरिकांच्या अन्नातील पोषण दर सुधारण्याच्या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे, या उद्देशाने हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता रेशन दुकानावर तांदूळ देणे बंद केले आहे. तांदूळ देणे बंद केले असले तरीही त्याजागी पोषण असलेले अनेक पदार्थ दिले जाणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला गहू, डाळ, साखर, मीठ, तेल, पीठ, सोयाबीन आणि मसाले दिले जाणार आहेत. (Ration Card Rule Change)
केवायसी करणे गरजेचे
रेशन कार्डधारकांना जर कमी किंमतीत किंवा मोफत रेशन हवे असेल तर तुम्हाला ई केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला जवळच्या रेशन दुकानात जाऊन तुमच्या अंगठ्याचा ठसा देऊन केवायसी पूर्ण करावे लागेल. तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही. तुम्ही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत केवायसी पूर्ण करु शकतात. (Ration Card Rule)