महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑक्टोबर ।। जसजसा मोबाईल जुना होऊ लागतो, तसतसा फोनचा परफॉर्मन्सही मंदावायला लागतो, इतकेच नाही तर काही वेळा फोन वारंवार हँग होऊ लागतो. स्मार्टफोन हँग झाल्यामुळे, फोन ऑपरेट करणे खूप कठीण होते, कारण कधीकधी फोन अशा प्रकारे हँग होतो की काहीही बॅकअप होत नाही. फोन हँग झाल्यामुळे प्रत्येकजण हैराण होतो, पण थोडा समजूतदारपणा दाखवला, तर ही समस्या दूर होऊ शकते.
मोबाईल हँग सोल्यूशन शोधण्याआधी, तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की फोनमध्ये हँग सारखी समस्या का उद्भवते, फोन वारंवार हँक का होतो? ही कारणे समजून घेतली, तर पुढच्या वेळी अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
फोनचे इंटरनल स्टोरेज किंवा रॅम पूर्ण भरल्यावर मोबाइलला तुमच्या कोणत्याही कमांडवर प्रक्रिया करण्यात अडचण येऊ लागते. इतकेच नाही, तर ॲप्स स्लो स्पीडने काम करतात आणि काही वेळा ॲप्स क्रॅशही होऊ लागतात. यासाठी तुमच्या फोनचे स्टोरेज भरू देऊ नका.
अनेक वेळा ॲप डेव्हलपर्सकडून गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरमध्ये ॲप अपडेट जारी केले जातात, परंतु ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याकडे लक्ष देणेही आम्ही आवश्यक मानत नाही. जुन्या आवृत्तीमध्ये काही प्रकारचे बग किंवा समस्या आल्यास ॲप डेव्हलपर कोणत्याही ॲपचे अपडेट रोल आउट करतात किंवा जर तुम्हाला ॲपमध्ये नवीन फीचर जोडायचे असेल तर याशिवाय ॲप सुधारण्यासाठी अपडेट्सही जारी केले जातात. काहीवेळा तुम्ही वापरत असलेल्या जुन्या व्हर्जनमधील बगमुळे फोन हँग होऊ लागतो, अशा परिस्थितीत ॲप्स अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो.
जर फोनची रॅम कमी असेल आणि तुम्ही एकाच वेळी अनेक ॲप्स बॅकग्राउंडमध्ये ओपन ठेवले असतील, तर बॅकग्राउंडमध्ये काम करणाऱ्या या ॲप्समुळे फोनचा परफॉर्मन्स कमी होऊ लागतो आणि काही वेळा फोन हँगही होतो. अशा परिस्थितीत, ज्या ॲप्सची आवश्यकता नाही ते बॅकग्राउंडमधून काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.