SRH Retain Player: हैदराबाद या खेळाडूंना करणार रिटेन; तर या खेळाडूला 23 कोटी देणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ऑक्टोबर ।। आयपीएल फ्रेंचायझींची डोकेदुखी वाढणार आहे. कारण येत्या काही दिवसात सर्व फ्रेंचायझींचीना आपले रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहे. सनरायझर्स हैदराबादने तयारी देखील सुरू केलीये.

ज्यात दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज हेनरिक कलासेनचे नाव आघाडीवर आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सनरायझर्स हैदराबादचा संघ क्लासेनला २३ कोटी रुपयांत रिटेन करू शकतो. यासह कर्णधार पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांना देखील रिटेन केले जाऊ शकते.

सनरायझर्स हैदराबाद संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे या संघाची संघमालक काव्या मारन समोर, कोणाला रिटेन करायचं असा प्रश्न असणार आहे. ईएसपीएन क्रीकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, काव्या मारन ट्रेविस हेड आणि कर्णधार पॅट कमिन्सला १८ कोटी रुपयांत रिटेन करू शकते.

तर भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीला देखील रिटेन केले जाऊ शकते. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहेत.

आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी
सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलिस्ट संघ आहे. दमदार कामगिरी करत या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलमध्ये या संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

गेल्या हंगामात पॅट कमिन्स या संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना या संघाने दमदार कामगिरी केली होती. संपूर्ण स्पर्धेत या संघाचा दबदबा पाहायला मिळाला होता. मात्र फायनलमध्ये या संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

सर्व फ्रेंचायझींना खेळाडूंवर बोली लावण्यासाठी १२० कोटींचा पर्स दिला जाणार आहे. तर खेळाडूंना रिटेन करण्यासाठी ७५ कोटी रुपये असणार आहेत. सर्व फ्रेंचायझी त्यांना वाटेल तसं ७५ कोटी खर्च करु शकतात. तर आयपीएलने ठरवून दिलेल्या स्लॅबनूसार, पहिला खेळाडू १८ कोटी, दुसरा खेळाडू १४ कोटी आणि तिसरा खेळाडू ११ कोटी रुपयांत रिटेन करता येऊ शकतो. तर २ अन्कॅप्ड खेळाडूंना ४ कोटी रुपयात रिटेन करता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *