महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑक्टोबर ।। महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही पहिली यादी जाहीर केली आहे. शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. यात अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. माहिममधून शिवसेनेने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळं ही निवडणुक अटी-तटीची ठरणार आहे.
अमित ठाकरे यांच्या रुपाने आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेने मंगळवारी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर काही वेळातच शिवसेनेकडूनही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर, अमित ठाकरे हे देखील माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं माहिम मतदारसंघात संघर्षाची लढाई होणार असल्याचे स्पष्ट दिसतंय.