राज्यात पाऊस घेणार विश्रांती; ‘या’ तारखेनंतर राज्यात थंडीची चादर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑक्टोबर ।। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रात्री जोराचा पाऊस तर दिवसा कडक ऊन, असे वातावरण पाहायला मिळत आहे. यादरम्यान आज पुन्हा हवामान विभागाकडून मुंबईत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच येत्या काही दिवसात राज्यात देखील पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

एक नोव्हेंबरपासून राज्यात थंडी
यासोबतच १ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची चादर पसरणार असून ऑक्टोबर अखेरला मान्सूनची सांगता होणार आहे. यासोबतच येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती,अकोला या भागात थंडीला सुरुवात होईल. यासोबतच सुरू असलेला पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारपासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते. २६ ते २९ दरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार दिवसात दक्षिण नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *