Drone Rules : दिवाळीत करायचे असेल ड्रोनने शूट, तर आधी जाणून घ्या हे नियम, अन्यथा मोजावा लागेल दंड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑक्टोबर ।। दिवाळीचा सण येताच लोकांना दिव्यांबरोबरच काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते. ड्रोन उडवणे देखील यापैकीच एक आहे. जर तुम्हाला दिवाळी आणि धनत्रयोदशीचे खास क्षण ड्रोन शूटच्या मदतीने टिपायचे असतील, तर त्यासंबंधीचे नियम आधी जाणून घेणे गरजेचे आहे. ड्रोन उडवणे ही काही क्षुल्लक बाब नाही. यासाठी काही नियम आणि कायदे आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.


ड्रोन उडवण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम

जर तुम्ही ड्रोनने शूट करण्याचा विचार करत असाल तर तसे करण्यापूर्वी ड्रोनशी संबंधित हे नियम नक्की जाणून घ्या.

ड्रोन नोंदणी: भारतात ड्रोन उडवण्यासाठी ड्रोन नोंदणी अनिवार्य आहे. यासाठी तुम्हाला डिजिटलस्काय या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल.

ड्रोन पावती क्रमांक : ड्रोनची नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला ड्रोन पावती क्रमांक मिळेल. हा क्रमांक तुमच्या ड्रोनसोबत नेहमी ठेवावा लागेल. हा ड्रोनचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UIN) आहे.

जिओ-फेन्सिंग: भारताचे हवाई क्षेत्र ग्रीन झोन, यलो झोन आणि रेड झोन या तीन भागात विभागले गेले आहे. या तिन्ही झोनमध्ये ड्रोन उडवण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थिती आहेत.

रिमोट पायलट परवाना: ड्रोन उडवण्यापूर्वी, तुम्हाला रिमोट पायलट परवाना घेणे आवश्यक आहे. विहित प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर हा परवाना मिळतो.

ड्रोन कुठे उडवले जाऊ शकत नाहीत?

ग्रीन झोन: हे असे क्षेत्र आहे, जेथे आपण कोणत्याही परवानगीशिवाय ड्रोन उडवू शकता, परंतु काही मर्यादांसह. या भागात तुम्ही 400 फूट किंवा 120 मीटर उंचीपर्यंत ड्रोन उडवू शकता. यापेक्षा जास्त उंचीवर ड्रोन उडवायचे असल्यास संबंधित प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते.

यलो झोन: या हवाई क्षेत्रात ड्रोन उडवण्यास बंदी आहे. येथे ड्रोन उडवायचे असल्यास एअर ट्रॅफिक कंट्रोल अथॉरिटीची परवानगी घ्यावी लागते. कार्यरत विमानतळाच्या 8 आणि 12 किलोमीटरच्या त्रिज्येतील क्षेत्राला यलो झोन म्हणतात.

रेड झोन: हे असे क्षेत्र आहे जेथे ड्रोन उड्डाण करण्यास कडक बंदी आहे. हे अतिशय संवेदनशील क्षेत्र आहेत, जसे की लष्करी तळ इ. येथे ड्रोन उडवण्याची परवानगी फक्त केंद्र सरकारच देऊ शकते.

ड्रोन उडवण्यासाठी किंवा ड्रोनने शूट करण्यासाठी तुम्हाला हे नियम पाळावे लागतील. ड्रोनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तुम्ही डिजिटलस्काय पोर्टलवर ड्रोनशी संबंधित सर्व अर्ज सबमिट करू शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *