जनता माझ्या पाठीशी, शंकर जगताप आणि राहुल कलाटे हे माझ्यासाठी आव्हान नाही – नाना काटे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑक्टोबर ।। चिंचवड विधानसभेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाना काटे यांनी बंडखोरी करत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन नाना काटे यांच्या रॅलीची सुरवात झाली. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे, उषा माई काळे, हरिभाऊ तिकोणे, खंडुशेठ कोकणे, शिरीष साठे, शेखर चद्रंकात काटे, शाम जगताप सचिन काळे, तानाजी जवळकर, नवनाथ नढे, चद्रकांत तापकीर, बापु कातळे, विष्णु शेळके, सागर कोकणे, संगिता कोकणे, प्रशांत सपकाळ, सुमित डोळस, काळुराम कवितके यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल करायला निघालेल्या नाना काटे यांचे चौकाचौकात फटाके फोडत, फुलांची उधळण करत जनतेने स्वागत केलं.

जनता आपल्या सोबत असल्याने ही लढाई आपल्यासाठी अवघड नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल कलाटे आणि महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचं आव्हान आपणं मानत नसल्याचेही काटे माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

काटे म्हणाले की, चिंचवडची जागा लायकी नसलेल्या आणि ज्यांचं डीपोझिट जप्त झालं होतं अशा उमेदवाराला दिली आहे. चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी मी मैदानात उतरलो आहे.

महायुतीचे तिकीट जाहीर झाल्यावर मी महाविकास आघाडीकडे तिकीट मागितलं होत. पण वरच्या नेत्यांना अंधारात ठेऊन खालच्या नेत्यांनी कलाटे यांना तिकीट दिल. मागच्या निवडणुकीत माझ्यासोबत एक लाख मतदान होत. यावेळी या एक लाख मतदानासह अनेक नागरिक माझ्यासोबत आहेत हा माझा विश्वास आहे. याच मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर मी ही निवडणूक जिंकेल असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *