Share Market Holiday: दिवाळीनिमित्त शेअर मार्केट कधी बंद राहणार? मुहूर्त ट्रेडिंग कधी?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑक्टोबर ।। देशभरात गुरुवारी 31 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीनिमित्त महाराष्ट्रासह विविध राज्यातील शाळा, महाविद्यालयांनी आपल्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. सरकारी कार्यालयांनादेखील यावेळी सुट्टी असेल. दरम्यान दिवाळीनिमित्त शेअर मार्केट किती दिवस बंद राहणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. दिवाळीच्या दिवसांमध्ये पूर्ण वेळ शेअर मार्केट बंद असेल असे काहीजण म्हणतायत. पण असे नाहीय. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याबद्दल जाणून घेऊया.

तर सलग 4 दिवस शेअर मार्केट बंद
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्याच्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये ऑक्टोबर महिन्यात 2 ऑक्टोबरनंतर कोणतीही सुट्टी नाहीय. दिवाळीची सुट्टी 1 नोव्हेंबर रोजी देण्यात आली आहे. यानंतर शनिवार, रविवार शेअर मार्केटला आठवड्याची नियमित सुट्टी असेल. अशाप्रकारे सलग 3 दिवस शेअर मार्केट बंद असेल. स्टॉक एक्सचेंजने नोटिफिेकेशन काढून 31 ऑक्टोबरलादेखील सुट्टी जाहीर केली तर सलग 4 दिवस शेअर मार्केट बंद राहू शकते.

 

केव्हा आहे मुहूर्त ट्रेडींग?
शेअर बाजारमध्ये यावेळी मुहूर्त ट्रेडिंग शुक्रवारी म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे 1 तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडींग सेशन असेल.शेअर बाजाराच्या वेगवेगळ्या नोटिफिकेशननुसार, सांकेतिक व्यवहाराचे सत्र संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘मुहूर्त’ किंवा ‘शुभ तासात’ ट्रेडींग करणाऱ्या गुंतवणुकदारांना समृद्धी आणि आर्थिक लाभ मिळतो असे मानले जाते.

मुहूर्त ट्रेडींगची वेळ
स्टॉक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीची अधिकृत सुट्टी आहे. या दिवशी बाजार बंद असेल. पण संध्याकाळी 1 तसासाठी विशेष व्यवहार विंडो खुली राहणार आहे. स्टॉक एक्स्चेंजने दिलेल्या माहितीनुसार प्री-ओपनिंग सत्र 5:45 ते 6:00 या वेळेत होणार आहे. त्याचवेळी, संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत विशेष व्यापार सत्र आयोजित केले जाणार आहे. बाजारातील विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी हा सण काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी आदर्श काळ मानला जातो. या सत्रातील गुंतवणूकदारांना वर्षभर व्यापारातून नफा मिळतो, असे मानले जाते.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुट्ट्या
31 ऑक्टोबर 2024 म्हणजेच गुरुवारपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. असे असले तरी काही लोक 1 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी हा सण साजरा करतात. यावेळी महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये शाळांना सुट्टी असते. महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. शिक्षकांना सुट्ट्याच्या काळात निवडणूक प्रशिक्षणाचे काम असते.इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शालेय आणि काँलेजच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुट्ट्या आहेत. यंदा महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना एकूण 14 दिवस सुट्ट्या असतील. राज्यातीन अनेक शाळा 12 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. काही प्राथमिक शाळा 16 नोव्हेंबरला सुरु होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *