जबरदस्त दिवाळी ऑफर ; 40000 सूट, 165km रेंज; Hero च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑक्टोबर ।। दिवाळीच्या निमित्ताने देशातील आघाडीची दुचाकी कंपनी Hero MotoCorp ने आपल्या इलेक्ट्रिक ब्रँड Vida, V1 Plus आणि V1 Pro च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटरवर जबरदस्त ऑफर दिली आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर कंपनी सर्वात मोठी सूट देत आहे.

या दोन्ही स्कूटरमध्ये 2 रिमूव्हेबल बॅटरी आहेत. या दोन्ही स्कूटर्स डिझाईन आणि फीचर्सच्या बाबतीत चांगल्या आहेत. यातच याची रेंज, किंमत, फीचर्स आणि यावर मिळणाऱ्या सुटबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

काय आहे दिवाळी ऑफर?
Hero Vida V1 Plus ची किंमत 1,02,700 रुपये आहे. तर Vida V1 Pro ची किंमत 1,30,200 रुपये आहे. या दोन्ही स्कूटरवर कंपनी 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय तुम्हाला Amazon-Flipkart वरून या स्कूटरवर खूप चांगले फायदे मिळतील. येथे तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा लाभ देखील मिळेल. याशिवाय यावरील ईएमआय 5,813 रुपयांपासून सुरू होईल. या सर्व ऑफर्सच्या माहितीसाठी तुम्हाला हिरो डीलरशीपशी संपर्क साधावा लागेल.

किती आहे रेंज?
बॅटरी आणि रेंजबद्दल बोलायचे झाल्यास Hero Vida V1 Plus मध्ये 3.44 kWh बॅटरी आहे. तर V1 Pro मध्ये 3.94 kWh बॅटरी पॅक आहे. दोन्ही प्रकारांमध्ये 6 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. Vida V1 Plus पूर्ण चार्ज केल्यावर 143km ची रेंज देऊ शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे. Vida V1 Pro पूर्ण चार्ज केल्यावर 165km ची रेंज देऊ शकते, असंही कंपनीचं म्हणणं आहे. दोन्ही स्कूटरचा टॉप स्पीड 80kmph आहे. दोन्ही स्कूटर एक मिनिट चार्ज करून 1.2 किमी अंतर कापू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.

Hero Vida V1 फीचर्स
Hero Vida V1 स्कूटर 2 रिमूव्हेबल बॅटरीसह येतात. याची बॅटरी काढली आणि चार्ज केली जाऊ शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड तुम्ही वाढवू शकता आणि जास्तीत जास्त 100 किमी प्रतितास पर्यंत नेऊ शकता. यात 7-इंचाची TFT स्क्रीन आहे, जी स्मार्ट कनेक्ट केलेल्या फीचर्ससह येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *