महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑक्टोबर ।। धनत्रयोदशी २०२४ कधी आहे?
वैदिक कॅलेंडरनुसार त्रयोदशी तिथी २९ ऑक्टोबरला सकाळी १०.३४ वाजता सुरू होते आणि ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १:१७ वाजता समाप्त होईल. त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यात येणार आहे.
धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त
धनत्रयोदशीची पूजा संधिकाळात केली जाते. अशा स्थितीत २९ ऑक्टोबर रोजी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ६:३१ ते ८:१३ असेल. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, गणेश आणि कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे.
धनत्रयोदशीी कोणत्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते.
धनत्रयोदशीला खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी लोक सोने, चांदी, भांडी, झाडू इत्यादी वस्तू खरेदी करतात. तसेच या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आरोग्य मिळते आणि आर्थिक समस्या दूर होतात.
कसे केले जाते धनत्रयोदशीचे पूजन?
या दिवशी सोने, चांदी , भांडी खरेदीला विशेष महत्त्व असते. “नवीन भांड्यामध्ये धणे भरून त्याचे पूजन केले जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रथा आहे.
“धनत्रयोदशी दिवशी, कणकेच्या पिठामध्ये हळद घालून दिवा तयार केला जातो आणि तो सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्यास सांगितला जातो. त्यामुळे यमाची कृपा होते असे मानले जाते.”
याशिवाय धनत्रयोदशीला लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुणीची पुजा केली जाते. घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते.