महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ नोव्हेंबर ।। वाहतूक पोलिसांकडून नूतनीकरण न झाल्याने प्रीपेड रिक्षा सेवा बंद करण्यात आली आहे. या सगळ्याचा फटका सामान्यांवर होत आहे. ऐन दिवाळी सणाच्यावेळी प्रीपेड रिक्षा बंद झाल्यामुळे रिक्षाचालक नागरिकांची लुटमार करत आहेत. या प्रकाराला रिक्षामित्र प्रीपेड रिक्षा बूथच्या माध्यमातून चाप बसला होता. पण आता बूथ चालविणाऱ्या रिक्षा मित्रच्या कराराचे नुतनीकरण झाल्यामुळे नागरिकांवर अशी वेळ आली आहे. वाहतूक पोलिसांनी नुतनीकरण न होण्यामागे आचारसंहितेचे कारण असल्याचे समजते.प्रवासी सेवा संघासोबत बूथ चालविण्यासाठी रिक्षामित्रने केलेले करार 22 ऑक्टोबरला संपुष्टात आला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून हा बूथ बंद करण्यात आला
गेल्या 100 दिवसांत आत्तापर्यंत अंदाजे 28 हजार प्रवाशांनी बूथचा लाभ वापर केला. प्रवासी सेवा संघाने रिक्षा मित्रसोबत हा करार केला होता. या संघाचे अध्यक्षपद वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तांकडे आहे. पुणे रेल्वे स्थानकात रिक्षाचालक प्रवाशांची लूट करीत असल्याच्या तक्रारी वारंवार येतात. प्रीपेड रिक्षा बूथ सुरू झाल्यानंतर या तक्रारी कमी झाल्या होत्या. आता पुन्हा प्रवाशांकडून जास्त भाडे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ऐन दिवाळीत रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या वाढते. याच काळात बूथ बंद झाल्याने काही रिक्षाचालक मनमानी भाडे सांगत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांकडून कानाडोळा केला जात असल्याची तक्रारही प्रवासी करीत आहेत.