डॉ. अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत कलाटेंच्या आज प्राचाराचा शुभारंभ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ नोव्हेंबर ।। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, मित्र पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी (ता. ६) सांयकाळी पाच वाजता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरापासून होणार आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे, महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या हस्ते ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या चरणी श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यासह घटक पक्षातील विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी कारकर्ते व चिंचवड विधानसभा क्षेत्रातील व वाकड गावातील ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित होणार आहेत.
त्यानंतर भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे या यात्रेत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. वाकड गवठाण, वाकड चौक,उत्कर्ष चौक, माऊली चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट चौक, वेणु नगर, पिंक सिटी रोड छत्रपती चौक, अंबियांस हॉटेल -मानकर चौक, वाकड चौक या मार्गे भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *