Maharashtra Weather : राज्यात गुलाबी थंडीची चाहूल ! पहा IMD चा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ नोव्हेंबर ।। राज्यातून मॉन्सून पूर्णपणे परतला नाही. परतीच्या पावसाने माघार घेतल्यानंतर आजही राज्यात अवकाळी पावसाचा जोर काही ठिकाणी आहे. काही जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाल्याची नोंद झाली आहे. तर काही ठिकाणी अद्याप उकाडा जाणवत आहे. प्रामुख्याने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे.


विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद जळगाव शहरात झाली आहे. मंगळवारी रात्री महाबळेश्वरमधील रात्रीचे तापमान १६.४ अंश होते.

पाच दिवस तापमानात घट

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वायव्य आणि पूर्व भारतात 5 नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवस पहाटेला तापमानात घट होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाशही पाहायला मिळणार आहे.

पावसाचे सावट कायम
राज्यात थंडीची चाहूल लागली असली तरी पावसाचे सावट कायम राहणार आहे. नोव्हेंबर महिना सुरु असताना देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नुसता पाऊस नाही तर राज्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होत आहे. अशावेळी सामान्यांना वीज पुरवठा पुरेसा होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *