Maharashtra Weather : राज्याच्या तापमानात घट ; पुढील 5 दिवसात कसं असेल वातावरण? पह हवामान विभागाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.७ नोव्हेंबर ।। काही भागात अजूनही उकाडा जाणवत आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यातील तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे नोव्हेंबर महिना सुरु झाला असूनही ऑक्टोबर हिट जाणवत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद जळगाव ही जिल्ह्यात शहरात आहे. कारण महाबळेश्वरमधील रात्रीचे तापमान हे 16.4 अंश होते.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वायव्य व पूर्व भारतात 5 नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवस पहाटेला तापमानात घट होणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाश आणि छान असा नजारा पाहायला मिळत आहे.

दिवाळीदरम्यान राज्यातील काही भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला. मात्र आता गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे आहे. राज्यात मागील 3 दिवसांपासून पावसाने उघडीप दिलीये. दरम्यान, पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कसे असणार, महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होणार का? याबाबत हवामान खात्याकडून माहिती दिली आहे.

शेतीच्या कामांना वेग
गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कापणीला सुरुवात झाली आहे. शेतकरी दिवाळीदरम्यान निवांत असतात कारण शेतीची काम संपलेली असतात. पण यंदा तस झालेलं नाही. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना शेतीची काम होतं.

IMD ने म्हटल्याप्रमाणे गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यात एक दोन ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद वगळता पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तापमान सध्या कमी झाले आहे. राज्याच्या तापमानात घट झालेली पाहायला मिळत आहे.

यामुळे काही दिवसांपासून पहाटे गारठा जाणवत असून थंडीची चाहूल सुरु झाली आहे. राज्यातील थंडीची तीव्रता येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात थंडीची तीव्रता वाढत असते यंदा मात्र दिवाळी उलटूनही थंडीची म्हणावी तशी तीव्रता पाहायला मिळालेली नाही. पण आगामी दिवसात चांगलाच गारवा जाणवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *