महाराष्ट्र 24 : दि. 11- भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी चिखली, मोशी परिसरातील सर्व गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकाऱ्यांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. आमच्या समस्यांसाठी मदतीला धावून येणाऱ्या महेश लांडगे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची हमी महिलांनी दिली. विशेष म्हणजे, रविवारी एकाच दिवसात आमदार लांडगे यांनी तब्बल १८ ठिकाणी आपुलकीच्या बैठकांना उपस्थिती दर्शवली. तसेच, सायंकाळी विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये सेक्टर- १२ येथे सभा घेण्यात आली. त्यामुळे प्रचाराचा ‘सुपर संडे’ झाला.
आमदार लांडगे यांनी शाईन सिटी, ब्ल्यू डाइस, केसर व्हेली, ऐश्र्वम म्हाडा,सिल्वर नाइन, डेस्टिनेशन मेमोर सोसायटी, मिस्ट्री ग्रीन, स्वराज फेज 3, मंत्रा गारमेट्स सोसायटी, गंधर्व एक्सलन्स क्लब, वूड्स व्हिलेज फेज 2, इंद्रधनू सोसायटी, कस्तुरी ओयाज या परिसरातील सर्व सोसायटीमधील नागरिकांच्या गाठीभेटीं घेतल्या. यावेळी सर्व ग्रामस्थ, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महेशदादांमुळे सोसायटीधारकांना दिलासा…
महापालिकांसाठी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) स्वच्छता व आरोग्य उपविधी उपयोगकर्ता शुल्क निर्धारित केले होते. सोसायटीधारकांवर आर्थिक बोजा पडणार होता. या उपयोगकर्ता शुल्काविरोधात आमदार महेश लांडगे यांनी आवाज उठविला. सभागृहात लक्षवेधी लावली आणि सोसायटीधारकांवर लादलेला 165 कोटी रुपये उपयोगकर्ता शुल्क माफ केला. बिल्डरसोबत बैठक घेऊन कन्व्हेयन्स डिडचा प्रश्न मार्गी लावला. अंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी आणले. त्यामुळे या भागातील पाण्याची समस्या सुटली.
***
‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकासाचे रोल मॉडेल…
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय आणले. मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू केला. त्यामुळे कचरा डेपोतून येणारा दुर्गंधीयुक्त वास बंद झाला. या भागातील विकास आराखड्यातील रस्ते विकसित केले. त्यामुळे आमच्या फ्लॅटच्या किंमती वाढल्या. आमच्या प्रश्नांसाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनासोबत संवाद मेळावा घेतला जातो. आमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार महेश लांडगे चोवीस तास उपलब्ध असतात. त्यामुळे आम्ही सोसायटीधारक त्यांच्यासोबत असल्याचा शब्द नागरिकांनी दिला.