महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ नोव्हेंबर ।। देशातील तरुणांना अधिकाधिक नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणीची अंतिम मुदत संपली होती. परंतु, ज्या उमेदवारांना निर्धारित तारखेला अर्ज भरता आला नाही, त्यांना सरकारने आणखी एक संधी दिली आहे.
त्यासाठी नोंदणीची अंतिम मुदत आता 15 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2024 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. आधार कार्डासोबतच उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक असेल.
या योजनेत सहभागी होण्यासाठी, उमेदवार पूर्णवेळ नोकरी किंवा शिक्षणात गुंतलेला नसावा. उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे आणि ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी इंटर्नशिप प्रोग्रामसाठी पात्र असतील.
अशी करा नोंदणी
पीएम इंटर्नशिप स्कीम ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला प्रथम रजिस्टर लिंकवर क्लिक करून आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर उमेदवाराला विचारलेले इतर तपशील अपलोड करावे लागतील. शेवटी पूर्णपणे भरलेला अर्ज सबमिट करा, अशा प्रकारे या योजनेसाठी उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे.