‘तुम्ही तुमच्या पायावर उभे राहून, एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून…. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला बजावले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ नोव्हेंबर ।। विधानसभा निवडणुकीसाठी आता काही दिवस बाकी राहिले आहेत. राज्यात राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांचा धुराळा उडताना दिसत आहे. भाजपचे केंद्रातील बडे नेते महाराष्ट्रात मुक्काम ठोकून आहेत. तर विरोधी पक्षातीलही नेतेही प्रचारसभांमधून सरकारवर आरोपांचे बाण सोडत आहेत. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटालाच तंबी दिली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराच्या प्रचार साहित्यात शरद पवार यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ वापरू नका, अशा स्पष्ट सूचना अजित पवार यांनी इलेक्टॉनिक परिपत्रक काढून (व्हॉटसअप, द्विटर, ई-मेल इत्यादीद्वारे) आपले सर्व उमेदवार, पदाधिकारीः तसेच निवडणूक प्रत्येकाला त्वरित द्याव्यात, अशी तंबी प्रक्रियेत सहभागी असलेल्या पक्षातील सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिली.

‘तुम्ही तुमच्या पायावर उभे राहून, एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकता,’ असे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने अजित पवार यांच्या पक्षाला बजावले. या प्रकरणी मंगळवारी (१९ नोव्हेंबर) पुढील सुनावणी होणार आहे. त्याआधी अजित पवार यांच्या पक्षाला आदेशाचे पालन करण्याबाबत आणखी एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेवर बुधवारच्या सुनावणीवेळी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छायाचित्रे आणि व्हिडिओ यांचा वापर नेत्यांकडून अजूनही शरद पवार यांची केला जात असल्याचा मुद्दा विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडला. अजित पवारांच्या वतीने वकील बलबीर सिंग यांनी बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *