Horoscope Today दि. १८ नोव्हेंबर ; आज आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी……………… ; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ नोव्हेंबर ।।

मेष:- घरगुती वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची मनधरणी करावी लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. वाहन चालवताना काळजी घ्या. मानसिक ताण जाणवेल.

वृषभ:- कामाच्या संदर्भातील प्रश्न सुटतील. आरोग्याबाबत दक्ष रहा. राजकीय पाठिंबा मिळेल. आलेल्या संधीचा लाभ घ्या. मित्रांशी बोलताना काळजी घ्या.

मिथुन:- मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमाच्या बाबतीत सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. नवीन योजनांविषयी गौप्यता पाळा.

कर्क:- आज धनवृद्धी होईल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. नोकरदारांची प्रतिष्ठा वाढेल. सहकारी वर्ग त्रासदायक ठरू शकतो. मैत्रीत वितुष्ट येऊ शकते.

सिंह:- आज तुमचा प्रभाव पडेल. दिवस उत्साहात जाईल. कौटुंबिक सन्मानात वाढ होईल. मित्रांसोबत प्रवासाला जाल. कामाच्या बाबतीत सतर्क राहावे.

कन्या:- व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या तक्रारी राहतील. अडचणीतून मार्ग काढता येईल. जमिनी संबंधी काम पार पडेल.

तूळ:- नवीन संधी चालून येईल. राजकीय दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. जवळचे मित्र भेटतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वृश्चिक:- कौटुंबिक जीवन आनंदी राहील. रखडलेले काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. चोरांपासून सावध राहावे. नोकरीच्या ठिकाणी आपली आब राखून वागाल.

धनू:- आर्थिक कामात यश मिळेल. बोलण्यात सौम्यता बाळगाल. आरोग्याची काळजी घ्या. कर्ज देणे टाळावे. मित्रांसोबत वेळ घालवाल. बाहेरील खाणे टाळावे.

मकर:- सकारात्मक दृष्टीने व्यवसाय करावा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यानी संयम बाळगावा. नवीन कामात सध्या हात घालू नका. भावंडांसोबत वेळ घालवाल.

कुंभ:- तरुणांना चांगली बातमी मिळेल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. आज भाग्याची साथ मिळेल.

मीन:- प्रतिष्ठेत वाढ होईल. रोजगाराच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याबाबत उदासीन राहू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *