Ajit Pawar : अजित पवार यांना बारातमी कोर्टाकडून समन्स जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ नोव्हेंबर ।। उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना 2014 च्या निवडणुकांमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे बारामतीच्या कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे (Suresh Khopade) यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांनी 2014 च्या निवडणुकांमध्ये उमेदवाराला मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करु असं वक्तव्य अजित पवारांनी 2014च्या लोकसभा निवडणुकांसाठी केलं होतं.

माझी आयपीएस अधिकारी सुरेख खोपडे यांनी अजित पवारांच्या याच वाक्याविरोधात याचिका दाखल केली आहे. सुरेश खापडे हे 2014 मध्ये आप पक्षाचे उमेदवार होते. त्यावेळी देखील त्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार बारामती कोर्टाने अजित पवारांना हे समन्स बजावलं आहे. तसेच त्यांन 16 नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी एबीपी माझासोबत संवाद साधताना यासंदर्भात माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळेंसाठी केली होती दमदाटी
अजित पवार यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार करताना गावकऱ्यांना ही दमदाटी केल्याची माहिती आहे. बारामतीमधील मासाळवाडी या गावमध्ये अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना मतदान करण्यासाठी दौरा केला होता. त्याचवेळी या गावात पाणीटंचाई भीषण प्रश्न होता. तेव्हा दादांन ‘सुप्रिया सुळे यांना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करु. तुमचा दोन महिन्यात पाणीप्रश्न सोडवतो.. आम्हालाच मतदान करा… अशी दमदाटी अजित पवारांनी बारामतीमधील गावकऱ्यांना केल्याचा आरोप आहे.

अजित पवार कोर्टात हजर राहणार?
अवघ्या काही तासांमध्ये राज्याच्या राजकारणाचा निकाल लागणार आहे. मागच्या अडीच वर्षांमध्ये राज्याच्या राजकीय परिस्थितीवर बरीच बदलली आहे. राजकारणात सुरु असलेला सावळा गोंधळ हा मतदारांच्या काही पचनी पडत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे 2024ची विधानसभा निवडणुक ही प्रत्येकासाठीच महत्त्वाची आहे. त्यातच जशी ही राजकीय लढाई आहे तशीच यंदा ही नात्यांचीही लढाई झालीये. ज्या सुप्रिया सुळेंसाठी अजित पवारांनी हे वक्तव्य केलं होतं, त्याच सुप्रिया सुळे यंदाच्या निवडणुकीत अजित दादांच्या विरोधात आहे. त्यामुळे निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर अजित पवार हे नियोजित तारखेला कोर्टात हजर राहणार की नाही याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *