IPL 2025 : प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएल २०२५चे सामने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ नोव्हेंबर ।। क्रिकेटप्रेमी (Cricket Lovers) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग आयपीएलची (IPL League) आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची (Champions Trophy 2025) चर्चा आणि आयपीएल २०२५ (IPL 2025) मेगा लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना यासाठीचे वेळापत्रक (IPL Timetable) जारी करण्यात आले आहे.

बीसीसीआयने (BCCI) आयपीएल २०२५चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर लगेचच आयपीएल २०२५ सुरु होणार आहे. हा सामना १४ मार्च ते २५ मे या कालावधीत खेळला जाणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयने आयपीएलच्या तिन्ही सीझनच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, २०२५चा पहिला हंगाम १४ मार्च ते २५ मे या कालावधीत खेळवला जाईल. दुसरा हंगाम १५ मार्च रोजी व अंतिम सामना ३१ मे रोजी होईल. तसेच आयपीएल २०२७ ची तारीख देखील समोर आली आहे. २०२७ चा आयपीएल सामना १४ मार्च ते ३० मे या कालावधीत असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *