महिनाच्या शेवटपर्यंत पगार टिकत नाही? मग 50-30-20 चा फॉर्मुला ठेवा लक्षात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ डिसेंबर ।। आयुष्यात आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी बजेटिंग ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. कमाई तर सर्वचजण करतात पण महिनाअखेर मिळालेल्या रक्कमेचा कोण कसा खर्च करतो हे महत्वाचे आहे. माझ्या हातात पगार टिकतच नाही, अशी बहुतांश जणांची तक्रार असते. उत्पन्नाचा योग्य वापर कसा करायचा हेच अनेकांना माहिती नसतं.


तुम्हीपण यापैकी एक असाल तर तुम्हाला 50-30-20 चा फॉर्मुला माहिती असायला हवा. नुसता माहितीच नव्हे तर तुम्ही याची खुणगाठ बांधून ठेवायला हवी. असेल केल्यास तुम्हाला आयुष्यात कधीच पैशांची चणचण भासणार नाही.

50-30-20 च्या फॉर्मुलामध्ये कोणतेही रॉकेट सायन्स नाहीय. हा अगदी सोपा नियम आहे. ज्यात तुमचे उत्पन्न तीन भागांमध्ये विभागले जाते. आवश्यक खर्च, इच्छा आणि सेव्हिंग. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवता येते. तसेच भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळकते

हा नियम समजण्यास सोपा तर आहेच, पण तो अंगीकारण्यासही अतिशय लवचिक आहे. तुम्ही किती कमावता, तुम्हाला किती पगार आहे?, इतका कमी पगार का आहे? हे सर्व महत्वाचे नाही. कारण या फॉर्मुलाद्वारे तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन करत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार तुमचा खर्च संभाळू शकता. या नियमाचे पालन करून तुम्ही तुमचे उत्पन्नात संतुलन राखू शकता. बचतीला प्राधान्य देऊन कर्ज कमी करण्याच्या दिशेने पावले टाकू शकता.

तुमच्या पगारातील 50% रक्कम ही गरजांवर खर्च करु शकता. जसे की भाडे, रेशन, वाहतूक आणि इतर आवश्यक गोष्टी यातून करता येतात. पगारातील 30% रक्कम तुमच्या इच्छांवर खर्च करु शकता. याद्वारे मनोरंजन, खरेदी आणि इतर छंद जोपासू शकता. पगारातील उर्वरित 20% रक्कम बचत आणि कर्ज फेडण्यासाठी करु शकता. यामध्ये आपत्कालीन निधी, गुंतवणूक आणि कर्जाची देयके देऊ शकता.

या अनोख्या फॉर्मुलाबद्दल ऐकून नोकरदार वर्गाला छान वाटले असेल. पण हा खऱ्या आयुष्यात अंमलात कसा आणायचा? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर यासाठी खूप सोपी पद्धत आहे. सर्वात आधी तुमचे उत्पन्न मोजा. मासिक खर्च निघाल्यावर किती रुपये शिल्लक राहतात, ते पाहा. यानंतर उरलेल्या खर्चाचे वर्गीकरण करा.

तुमच्या गरजा, इच्छा आणि बचत यामध्ये विभागणी करा. पुढे शिल्लक खर्च पाहा. जर तुम्ही इच्छांवर जास्त खर्च करत असाल तर त्यात कपात करा. आता ऑटोमेशन लागू करा. म्हणजेच बचत आणि कर्ज परतफेडीसाठी किती रक्कम द्यायची हे ठरवा. वेळोवेळी तुमच्या योजनेचे पुनर्मूल्यांकन करा.

हा फॉर्मुला अगदी साधा, सरळ आहे. ज्यात बचतीला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच तुमचे उत्पन्न आणि खर्च यांच्यात ताळमेळ साधणारा आहे. यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्ज कमी होण्यास मदत होते.

वाचून फॉर्मुला सोपा वाटत असला तरी महागड्या शहरांमध्ये याचे पालन करणे 50% नोकरदारवर्गाला कठीण जाते. आपल्या इच्छांवर खर्च मर्यादित करण्याचे आव्हान आपल्यासमोर असते.

तुमचे मासिक उत्पन्न 50 हजार रुपये असेल तर त्यातील 25,000 रुपये गरजांसाठी ठेवा. ज्या फार महत्वाच्या नाहीत पण उपयुक्त आहेत अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी 15 हजार रुपये ठेवा. 10,000 रुपये कर्ज फेडण्यासाठी ठेवा. तर 10,000 रुपयांची बचत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *