महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ डिसेंबर ।। महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. आता विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार आल्यानंतर महिलांना २१०० रुपये मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार असल्याचे सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्यांना आता अर्ज भरता येणार का? असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे. (Ladki Bahin Yojana)
आतापर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला नाही. काही अडचणींमुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही, अशा महिलांना आता फॉर्म भरता येणार का अशा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती. परंतु अनेक महिलांना अर्ज भरता न आल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ होती. त्यामुळे सध्या तरी कोणत्याही महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही. (Ladki Bahin Yojana Application Process)
लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही निकष दिले आहेत. त्या निकषांचे पालन केल्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे.
अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
२१ ते ६५ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्या महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत.
ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.