Income Tax: ​तुमच्या चुकांवर आयकर विभागाची करडी नजर, ही कागदपत्रं जपा नाहीतर नोटीससाठी राहा तयार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल ।। तुम्हीपण नोकर करत आहात आणि दरवर्षी टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत असाल तर तुम्हाला सावधिगिरी बाळगण्याची गरज आहे. आयकर विभाग सध्या देशभरातील करोडो करदात्यांवर करडी नजर ठेवून असून त्यांच्यावर नोटीस पाठवण्याची कारवाई करत आहे. पण सर्वाधिक लक्ष अशा लोकांवर ठेवले जात आहे ज्यांनी घरभाडे भत्ता म्हणजे HRA क्लेमसाठी चुकीचे दावे केले आहेत.

अशा करदात्यांना इन्कम टॅक्स विभागाची नोटीस मिळाली तर त्यांनी पुढे काय कारण आणि कोणती कागदपत्रे जवळ ठेवावी याबाबत आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

बनावट कागदपत्रे बनवून करतात कर बचत
बहुतांश लोक भाड्याने राहत नाहीत, पण टॅक्स वाचवण्यासाठी त्यांच्या कार्यालयात किंवा आयकर रिटर्न भरताना चुकीचा HRA दावा करतात. अनेक लोक बनावट पॅनकार्ड वापरूनही घरभाडे भत्ता सवलतीचा चुकीचा लाभ घेतेय. त्याचवेळी काही लोक असेही आहे जे आपल्या पालकांच्या नावे असलेल्या घरात राहण्यासाठी पैसे देतात हे दाखवतात. म्हणून वडिलांच्या नावावर घर असून दरमहिन्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पैसे देतात, असा खोटा दावा करतात, पण वास्तविक असं काहीच घडत नाही. त्यामुळे आता आयकर विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

कर चोरी पडल्यास किती नुकसान होईल?
लक्षात घ्या की आयकर विभागाने तुमची चोरी पकडली तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करताना खोटा HRA दावा केल्यास इन्कम टॅक्स विभाग तुमच्याकडून रक्कम वसूल करेल, पण तुम्हाला त्यावर व्याज आणि ३०० टक्के दंडही भरावा लागेल.

खालील दस्तऐवज सांभाळून ठेवा
अशा परिस्थितीत, जर तुम्ही HRA दावा करत असाल तर तुमच्याकडे काही कागदपत्रे नेहमीच सांभाळून ठेवा आणि काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्या. सर्वप्रथम घरभाडे करार आणि दरमहिन्याला मिळणारी पावती जपून ठेवा. तसेच जर तुम्ही तुमच्या पालकांना भाडे किंवा पैसे देत असाल तर त्याचा पुरावाही तुमच्याकडे असला पाहिजे, नाहीतर भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते आणि पुराव्यासह आयकर नोटीसला उत्तर द्यावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *