पुढच्या दोन महिन्यांत एकनाथ शिंदे दिसणार नाहीत; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल ।। लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.

हिंगोली, परभणी, नांदेड येथे आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटपावरून महायुतीमध्ये अजूनही तिढा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला हवा तेवढा फायदा होताना दिसत नसल्याचे अनेक सर्व्हे सांगत आहेत. त्यामुळे दोन महिन्यांनंतर ते भाजपसोबत दिसणार नाहीत, असे आंबेडकर म्हणाले.

z मोदी हे पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे मोदींविरोधात मतदान करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. मोदी तर भाजपलाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच ते भाजपा सरकार न म्हणता नेहमी मोदी सरकार असा उल्लेख करतात, असे आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *