ITR File : आता उरले फक्त 9 दिवस… इनकम टॅक्ससंदर्भात लगेच करुन घ्या ‘हे’ काम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ डिसेंबर ।। तुम्ही ITR भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल, तर विलंब शुल्कासह फाइल करण्याची अंतिम मुदत लवकरच संपणार आहे . आयकर विभागाने 31 जुलै ही आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख निश्चित केली होती, जी विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानुसार आता उशीर झालेला ITR भरण्यासाठी फक्त 9 दिवस उरले आहेत. जर तुम्ही या तारखेपर्यंत आयकर रिटर्न भरण्यास सक्षम नसाल तर 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. याशिवाय तुम्हाला आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

31 डिसेंबरपर्यंत मुदत
आर्थिक वर्ष 2023-24 (मूल्यांकन वर्ष 2024-25) साठी ITR दाखल करण्याची 31 जुलैची अंतिम मुदत चुकलेल्या करदात्यांना 31 डिसेंबरपर्यंत विलंबित रिटर्न किंवा विलंबित ITR भरण्याची संधी आहे. आयकर कायद्याच्या कलम 234F नुसार विलंब शुल्कासह ते दाखल केले जाऊ शकते. वार्षिक उत्पन्नानुसार विलंब शुल्क दोन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे.

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ते 1000 रुपये विलंब शुल्क भरून हे काम करू शकतात. तर कोणत्याही करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, त्यांच्यासाठी विलंब शुल्क 5,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तुम्ही या तारखेपर्यंत कितीही वेळा सुधारित रिटर्न फाइल करू शकता. सुधारित विवरणपत्र भरण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही.

मुदत चुकली तर काय होईल?
आता जर करदात्यांची 31 डिसेंबरची मुदत चुकली तर 5 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी या मुदतीनंतर दंडाची रक्कम 10,000 रुपयांपर्यंत वाढेल. याशिवाय या चुकीनंतर आयकर विभागाकडून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *