IND vs AUS 4th Test: टीम इंडिया ‘MCG’ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक करणार? जाणून घ्या रेकॉर्ड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ डिसेंबर ।। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना (दि.26) पासून सुरु होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता हा सामना सुरू होईल. सध्याची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत, बॉक्सिंग डे कसोटी सामना जो संघ जिंकेल, तो कसोटी मालिकेत 2-1 अशी अभेद्य आघाडी घेईल.

भारताचे लक्ष एमसीजीमध्ये विजयाकडे
भारतीय संघाने कांगारूंच्या विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात भारताने 4 कसोटी जिंकल्या आणि 8 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. तर दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले. पण, चांगली गोष्ट म्हणजे गेल्या दोन दौऱ्यांमध्ये भारताने या मैदानावर कसोटी सामने जिंकले. तर त्याआधीही एक सामना अनिर्णित राहिला होता. आता या मैदानावर भारताला विजयाची हॅट्ट्रिक करण्याची उत्तम संधी आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आतापर्यंत 116 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने 52 सामने जिंकले. तर 47 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर 17 सामने अनिर्णित राहिले. 81 प्रसंगी, मेलबर्नमधील संघांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत, त्यांनी 40 कसोटी सामने जिंकले, 30 गमावले आणि 11 सामने अनिर्णित राहिले. असे 35 प्रसंग होते. जेव्हा संघांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या काळात त्याने 12 सामने जिंकल्या. तर 17मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. 6 सामने अनिर्णित राहिले. ऑस्ट्रेलियाने MCG मधील सर्व 116 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. या काळात त्यांनी 67 सामने जिंकले. तर ऑस्ट्रेलियाला 32 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. 17 कसोटी सामने अनिर्णित राहिले.

क्रिकेटच्या इतिहासातील पहिली कसोटी एमसीजीवर
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे इतर मैदानांच्या तुलनेत या मैदानावर चौकार आणि षटकार कमी दिसतात. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते. या मैदानाची प्रेक्षकांची क्षमता एक लाखाच्या आसपास आहे. या मैदानावर क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना MCG ने आयोजित केला होता. तो ऐतिहासिक सामना 15-19 मार्च 1877 रोजी खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 45 धावांनी पराभूत केले होते.

मेलबर्नमध्ये भारतीय संघाचे निकाल (ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्व कसोटी)
जानेवारी 1948 : 233 धावांनी पराभव

फेब्रुवारी 1948 : एक डाव आणि 177 धावांनी पराभव

डिसेंबर-जानेवारी 1968 : एक डाव आणि 4 धावांनी पराभव

डिसेंबर-जानेवारी 1978 : 222 धावांनी विजय

फेब्रुवारी 1981: 59 धावांनी विजय

डिसेंबर 1985 : अनिर्णित

डिसेंबर 1991 : 8 गडी राखून पराभव

डिसेंबर 1999 : 180 धावांनी पराभव

डिसेंबर 2003 : 9 गडी राखून पराभव

डिसेंबर 2007 : 337 धावांनी पराभव

डिसेंबर 2011 : 122 धावांनी पराभव

डिसेंबर 2014 : अनिर्णित

डिसेंबर 2018 : 137 धावांनी विजय

डिसेंबर 2020 : 8 गडी राखून विजय

मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड
एकूण कसोटी सामने : 116

विजय : 67

पराभव : 32

अनिर्णित : 17

 

मेलबर्नमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया हेड टू हेड
एकूण कसोटी सामने : 14

भारत जिंकला : 4

ऑस्ट्रेलिया जिंकला : 8

अनिर्णित : 2

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ
भारतीय क्रिकेट संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यू इसवरन, देवदत्त पडिककल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

शेवटच्या दोन कसोटींसाठी ऑस्ट्रेलियन संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन , नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *