HMPV Virus: आता चीनमधील HMPV विषाणूचा रुग्ण गुजरातमध्ये सापडला ; देशातील रुग्ण संख्या 3 वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जानेवारी ।। चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असलेल्या HMPV व्हायरसचा शिरकाव आता भारतामध्येही झाला आहे. कर्नाटकामध्ये 2 या व्हायरसची लागण झालेले 2 रुग्ण समोर आल्यानंतर आता गुजरातमध्ये तिसरा रुग्ण सापडला आहे. अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाची टीम अजून चाचण्या करणार आहेत. 15 दिवसांपूर्वी बाळाची तब्येत बिघडल्याने त्यास रुग्णालयात दाखल केले गेले होते. बाळ काही दिवस व्हेंटिलेटरवरही होते. आता तपासणीअंती एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बाळाची प्रकृती स्थिर
गुजरातच्या आरोग्य विभागाने सांगितले की, बाळाच्या चाचणीचा रिपोर्ट रुग्णालयाचा असून आमच्या लॅबमध्ये याचे परीक्षण करण्यात आले नाही. बाळाची प्रकृती आता स्थिर असून गुजरातच्या आरोग्य विभागाने HMPV विषाणूबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील डुंगरपूर येथे राहणारे कुटुंब हे आपल्या 2 महिन्याच्या बाळासोबत अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कर्नाटकात व्हायरसची लागण झालेले 2 रुग्ण
कर्नाटकमध्ये भारतातील पहिले दोन रुग्ण सापडले होते. बंगळुरुच्या रुग्णालयात 3 महिन्यांच्या बाळाला ब्रॉन्कोप्न्यूमोनियामुळे दाखल करण्यात आले होते. नंतर त्या बाळावर एचएमपीवीचा उपचार करण्यात आला आता त्या बाळास डिस्चार्ज दिला गेला आहे. व्हायरसच्या संसर्गाची दुसरी केस कर्नाटकातच सापडली होती. बंगळुरुच्या रुग्णालयातच 8 महिन्याच्या बाळाला ब्रॉन्कोप्न्यूमोनियामुळे दाखल करण्यात आले आहे. या बाळावर सध्या उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारत आहे.

चीनमधील परिस्थिती
चीनमध्ये HMPV व्हायरसने हजारो लोकांना संक्रमित केले असून तेथील परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जात असून रुग्णालयाबाहेर रुग्णांची गर्दी होत आहे. HMPV व्हायरससंबंधी चीनकडून अद्याप कोणतीही विशेष माहिती देण्यात आलेली नाही. या व्हायरस संदर्भातील देशातील परिस्थितीबद्दल चीन बरेच काही लपवत आहे. या व्हायरसची लक्षणे ही कोरोना व्हायरस सारखी असल्याचे समोर आले आहे मात्र एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अजूनही नगण्य असल्याचे बोलले जात आहे.

देशात आढळलेल्या रुग्णानंतर भारत सरकार अलर्ट मोडवर आले असून आरोग्य विभागाने या व्हायरससंबंधी तातडीची बैठक बोलावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *