Vinod Kambli Wife : सचिन तेंडुलकरने दिलेली मदत विनोद कांबळीच्या बायकोने नाकारली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जानेवारी ।। भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला गंभीर आजारामुळे ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता विनोद कांबळीची तब्बेत बरी असून त्याला डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. कांबळीच्या आजारादरम्यान अनेकांनी त्याला मोलाची मदत केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुद्धा मदतीचा हात पुढे केला. मात्र विनोद कांबळी घरी परतल्यावर त्याला राहतं घर गमावण्याची वेळ आली होती. हॉस्पिटलचा खर्च, मुलांचा शिक्षणाचा खर्च त्यात विनोदला नोकरी नसल्याने हा खर्च नक्कीच पेलवणारा नव्हता. अशातच सचिन तेंडुलकरने कांबळीच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची मदत पुढे केली असता विनोदच्या पत्नीने ती मदत नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे.

विनोद कांबळीच्या पत्नीने मदत का नाकारली ??
“सचिन तेंडुलकरने विनोद आणि आम्हाला फार मदत केली. आमचे कुटुंब सुस्थितीत कसे येऊ शकते, यासाठी सचिनने आम्हाला मदत केली. सचिनने तर आमच्या दोन्ही मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठीही पैसे पाठवले होते. पण ते पैसे मी परत केले. विनोद कांबळीच्या आजारपणात सगळ्यांनी मोलाची साथ दिली. हॉस्पिटलच्या खर्चातही सगळ्यांनी खारीचा वाटा उचलला.मात्र कितीही वाईट परिस्थिती आली तर मुलांची फी दुसऱ्या व्यक्तींकडून भरण्याची वेळ आमच्यावर येऊ नये.” असे विनोद कांबळीची बायको अँड्रियी म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *