महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जानेवारी ।। या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बोलतात कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला सोडलं आणि सगळ्यांना मोका लावला. मुख्य आकाला स्वतःकडे ठेवायचं. आम्हाला अपेक्षा होती की ते न्याय करतील. पण गुन्हेगारांना त्यांनी खपवून घेतलं आहे. वाल्मिक कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे. लहान मासे कापले आहेत आणि मोठे मासे आहेत, अशी टीका शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आज विरोधकांवर केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सोडून इतर आरोपींवर एसआयटीने मोका लावला आहे. त्यावर त्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना ही टीका केली आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिकागोमध्ये असं राज्य चालायचं. राज्यकर्ता माफियांना पाठबळ द्यायचा. या महाराष्ट्रमध्ये तसंच सुरु आहे. सुरेश धस हे भाजपचे आहेत, तुमच्याही पक्षेचे आमदार आक्रोश करत आहे. तुम्ही फक्त हे ढोंग करत आहात. तरीही मुख्यमंत्री काहीही करत नसतील तर त्यांना माफियांना पाठींबा द्यायचा आहे. याला रिकामटेकडेपणाचे उद्योग म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना संरक्षण दिलं पाहिजे पण हे मुख्य आरोपीला वाचवायला चालले आहेत. सरकार प्रोटेक्शन मनी घेतंय का? असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, मनपा निवडणूक स्वबळावर लढण्यावर देखील राऊतांनी भाष्य केलं आहे. मी कधीही म्हटलं नाही की मवीआ फुटली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी आम्ही एक भूमिका मांडत आहोत. पक्षप्रमुख सर्वांच्या भावना जाणून घेत आहेत. आघाडी विधानसभेसाठी होती, लोकसभेसाठी इंडिया आघाडी होती. भाजपसोबत असताना आम्ही एकटे लढलो. त्यांनी आमचं विधान ऐकायला हवं होत, असं ते म्हणाले.