पीसीबी पाहत आहे रोहित शर्माची वाट, हिटमॅन जाणार पाकिस्तानला ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जानेवारी ।। पाकिस्तानमध्ये सध्या ते होस्ट करत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीची (Champions Trophy) तयारी जोरात सुरू आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेला एक महिना बाकी असतानाही अद्याप सर्व स्टेडियम पूर्णपणे तयार झालेले नाहीत. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डला (PBC) विश्वास आहे की सर्वकाही वेळेवर तयार होईल. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा स्पर्धेपूर्वी पाकिस्तानला जाऊ शकतो, अशी बातमी समोर आली आहे.

रोहित शर्मा का जाणार पाकिस्तानला?
चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा 16 किंवा 17 फेब्रुवारीला होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताला आमंत्रण देण्यात आले आहे आणि तो या कार्यक्रमाला उपस्थित राराहील असा विश्वास पीसीबीला आहे. पीसीबीच्या एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, कर्णधारांच्या फोटो शूटच्या वेळापत्रक आणि कार्यक्रमापूर्वीच्या पत्रकार परिषदेबाबत आयसीसीच्या निर्णयाची वाट पाहत आहे. आठ संघांसोबत ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून कराची येथे सुरू होणार आहे.

टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. खूप वेळानंतर भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार असे ठरवण्यात आले. टीम इंडिया 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. सूत्रानुसार, पीसीबीला त्यांच्या सरकारकडून सर्व मान्यता मिळाल्या आहेत जेणेकरुन प्री-टूर्नामेंट कार्यक्रमांसाठी येथे येणाऱ्या सर्व कर्णधार, खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांना व्हिसा त्वरित जारी करता येईल.

पीसीबीने आयसीसीला दिली माहिती
पीटीआयला आणखी एका सूत्राने पुष्टी दिली की पीसीबीने आयसीसीला हे स्पष्ट केले आहे की सर्व संघ आणि त्यांच्या कर्णधारांसह उद्घाटन समारंभ पाकिस्तानमध्ये होईल. “हे सामान्य प्रोटोकॉलनुसार आहे आणि पहिला सामना 19 फेब्रुवारीला असल्याने, उद्घाटन समारंभ 16 किंवा 17 तारखेला होणे अपेक्षित आहे. ” असे सूत्राने सांगितले. यामध्ये रोहित किंवा इतर कोणत्याही भारतीय संघातील खेळाडू किंवा अन्य अधिकृत किंवा बोर्ड अधिकारी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *