महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि.६ फेब्रुवारी ।। सोने हा सर्वात मौल्यवान आणि महाग धातूंपैकी एक आहे. भारतात सोन्याला खूप महत्त्व आहे आणि सध्या ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक देखील आहे. सध्या सोन्याच्या भावाने विक्रमी पातळी गाठली आहे. MCX वर सोन्याचा भाव 84,200च्या वर गेला आहे.
सोन्याने 2025 मध्ये गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून, सोन्याने 36 दिवसांत गुंतवणूकदारांना 10.5 टक्के परतावा दिला आहे. तर सेन्सेक्सने दिलेल्या 0.24 टक्के परताव्याच्या कितीतरी पटीने तो जास्त आहे.
सोन्याने 1 जानेवारी 2025 ते 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत एकूण 10.5 टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी चांदीने 11 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत शेअर बाजाराच्या परताव्याबद्दल बोलायचे तर सेन्सेक्स 0.24 टक्क्यांनी वाढला आहे, निफ्टी 0.21 टक्क्यांनी वाढला आहे तर बँक निफ्टी -1 टक्क्यांनी वाढला आहे.
सोन्याने 2024 मध्ये गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा दिला होता. याच कालावधीत सेन्सेक्सने दिलेल्या 8.35 टक्के परताव्याच्या दुप्पट होता. 1 जानेवारी 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, जी 23 डिसेंबरला वाढून 76,160 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे म्हणणे आहे की, 2025 मध्ये सोन्याची मागणी 700 टन ते 800 टन होण्याची अपेक्षा आहे. 2025 मध्ये जागतिक सोन्याची मागणी वार्षिक आधारावर 1 टक्क्यांनी वाढून 4,974.5 टन होऊ शकते. वर्ष 2024 मध्ये, सरासरी सोन्याच्या किमतीत वार्षिक आधारावर 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.