महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – दिनांक- 21- डाँ. डि.वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि रूग्णाल तर्फे आरोग्य शिबीर संपन्* मोरवाडी म्हाडा :- डाॅ डि.वाय पाटील मेडिकल कॉलेज संत तुकाराम नगर व डाँ. डि.वाय पाटील मेडिकल कॉलेज (UHTC) ओपीडी अजमेरा यांच्या तर्फे नाना नानी पार्क कापसे उद्यान जेष्ठ नागरिक संघ सभागृहात आरोग्य शिबीर संपन्न झाले शंभर महिला आणि पुरुष सहभाग घेतला या शिबीरात मोफत औषधोपचार तसेच हिमोग्लोबीन व शुगर तपासणी , सर्दी ताप थंडी , हात पाय दुखणे यांच्यावर उपचार करण्यात आले तसेच आभा कार्डची नोंदणी करण्यात आली शिबीराचे आयोजन सौ. रेणुकाताई भोजने संचालिका कै. नंदाआई प्रतिष्ठान अहिल्या प्रतिष्ठान श्री दिपक भोजने मा.विशेष कार्यकारी अधिकारी , शहर अध्यक्ष मल्हार आर्मी यांनी केले.
मोरवाडी जेष्ठ नागरिक संघ , डाॅ. डि.वाय पाटील मेडिकल कॉलेज व रूग्णालयाचे डाॅ. रामाय्या नायर , डाॅ. श्रेया सेनगुप्ता , डाॅ. आदित्य प्रसाद , डाॅ. पी. जे. थोरात समाज सेवक श्री कारभारी मोरे , समाज सेविका तेजस्वीनी घाडगे , श्री मनोज चिकनीस , श्री संतोष कुलकर्णी , मंजुषा कांबळे , डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज व रूग्णालयाचे कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभले मोरवाडी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री माडगूळकर सर , श्री झिरपे काका , प्रा. नाईक सर , श्री दादा शिरोळे श्री सुभाष सुर्यवंशी , ओकांर गायकवाड , गोविंद रावत हे उपस्थित होते प्रत्येक गुरुवारी मोरवाडी जेष्ठ नागरिक संघ सभागृहात आरोग्य शिबीराचे १० ते १२ या वेळेत आयोजन केले जाते ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी अजमेरा येथील ओपीडीत तपासणी करु शकता याचा मोरवाडीत परीसरातील जेष्ठ नागरिक , महिला , नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेणुका भोजने आणि दिपक भोजने यांनी केले.