महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. २२ फेब्रुवारी ।। अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमावादाचा प्रश्न वेळोवेळी उफाळून येत असतो. आता पुन्हा दोन्ही राज्यांमधील वाद पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही राज्यातील वादाला खतपाणी घालणारी घटना कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे घडली आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर हल्ला केल्याची घटना घडलीय.
पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे बस आल्यानंतर कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडीगांनी बस थांबवली. त्यानंतर त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का? अशीही विचारणा केली. त्यानंतर बसला आणि चालकाला काळ फासण्यात आलं. चालकाला मारहाण देखील झाल्याची माहिती मिळालीय. या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.
कर्नाटकचा भाग असलेल्या बेळगावातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी बरीच आंदोलनं केली. पण कर्नाटकातील सत्ताधाऱ्यांनी राजकीय ताकदीने ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय.