महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. ३१ मार्च ।। उद्यापासून नवीन २०२५-२६ हे आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. नवीन आर्थिक वर्षात नवीन कर प्रणालीदेखील लागू होणार आहे. त्यामुळे करदात्यांच्या आणि गुंतवणूकदारांच्या खिशावर चांगलाच परिणाम होणार आहे. यामुळे काही कामे ही तुम्हाला आजच पूर्ण करायची आहेत. या वर्षात जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला पुढच्या वर्षी टॅक्समधून सवलत मिळणार आहे.तुम्हाला टॅक्ससंबंधित ही कामे आजच पूर्ण करायची आहेत.
ही कामे ३१ मार्चपूर्वी करा पूर्ण
टॅक्स डिडक्शनचे फायदे (कलम 80C )
तुम्ही कलम 80C अंतर्गत टॅक्समधून सवलत मिळवू शकतात. तुम्ही पीपीएफ, ईएलएसएस, एफडीमध्ये गुंतवणूक करुन १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर टॅक्सपासून सूट मिळवू शकतात.
एनपीएसमध्ये गुंतवणूक
तुम्ही नॅशनल पेन्शन योजनेत ५०,००० रुपयांच्या गुंतवणूकवर कलम 80CCD (1B)अंतर्गत सूट मिळते. याचसोबत कलम 80C अंतर्गत १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर सूट मिळते.
Income Tax 2025
EPFO 3.0 लवकरच होणार लाँच; PF चे पैसे ATM मधून पैसे काढणे ते क्लेम सेटलमेंट सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार
आरोग्य विमा
जर तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स खरेदी केला असेल तर ७५००० रुपयांच्या प्रिमियमवर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. तर ज्येष्ठ नागरिकांना ५०,००० रुपयांच्या गुंतवणूकीवर सूट मिळणार आहे.
अपडेटेड आयटीआर
तुम्ही २०२३-२४ चे अपडेटेड आयटीआर आजपर्यंत दाखल करु शकतात. तुमचे मागच्या आयटीआरमध्ये काही चुका झाल्या असतील किंवा तुम्ही आयटीआर भरला नसेल तर तुम्ही तो भरु शकतात.
टॅक्स भरण्याची शेवटची तारखी
२०२३-२४ या वर्षात टीडीएस भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. जर तुमचा टीडीएस १०,००० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही तो आजपर्यंत भरा अन्यथा तुम्हाला भरावा लागेल.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लवकरात लवकर लिंक करा. अनेक कामांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे.
चलन कम सर्टिफिकेट
तुमच्या टॅक्स डिडक्शनसाठी चलन कम सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे.
फॉरेन इन्कम क्लेम
तुम्हाला तुमच्या फॉरेन इन्कमच्या क्लेमचे स्टेटमेंट अपलोड करावे लागणार आहे. याचसोबत तुमचा टॅक्स भरायचा आणि डिडक्शन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
TDS ची माहिती
तुम्हाला टीडीएस डिडक्शनसाठी व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. यासाठी 26AS and AIS फॉर्म चेक करावा लागेल.
HRA आणि LTA क्लेम
तुम्ही घराचे भाडे (HRA) ची रिसिप्ट सबमिट करावी लागणार आहे. तुम्ही ३१ मार्चपूर्वी HRA आणि LTA क्लेमसाठी अर्ज करु शकतात.