आमदार अण्णा बनसोडे यांचा जनता दरबार सुसाट ; न्याय मात्र ऑन दी स्पॉट ;सर्वसामान्यांच्या समस्यांचे तात्काळ निवारण

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – दि. २३ ऑगस्ट – सध्या जगभर कोव्हिड-19 रोगाच्या कोरोना व्हायरस या आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला असताना पुण्यासह पिंपरी-चिंचवड कोरोना हॉटस्पॉट बनलेला आहे. मात्र, पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा जनता दरबार सध्या शहरात खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार अण्णा बनसोडे स्वत: दररोज 300 लोकांची समस्या ऐकतात आणि त्वरित संबंधित विभाग अधिकार्यांना बोलावून काम मार्गी लावतात. कोणत्याही तक्रारदाराने निराश होऊन त्यांच्या जनता दरबारातून परत जाऊ नये. यासाठी आमदार बनसोडे कायम प्रयत्नशिल असतात. काळभोरनगर येथील ग्रँड इक्विविटा हॉटेलमध्ये दररोज सुमारे 300 तक्रारदार जनता दरबारात उपस्थिती दर्शवितात. हा दरबार सकाळी 11 वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नॉनस्टॉप सुरू राहतो.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांची नुकतीच बैठक बोलावली आणि आगामी २०२२ सालच्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत आणण्यासाठीचा विजयीमंत्र कार्यकर्त्यांना दिला. स्थानिक नेते, पदाधिकारी नगरसेवकांनी संगठन वाढीसाठी नेमके काय प्रयत्न करावेत, याविषयीचे मार्गदर्शन ते नगरसेवक तसेच पदाधिकार्यांना करतात. यामुळे कार्यकर्त्यांसह पदाधिकारी यांच्यामध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे.

कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकप्रतिनिधी घरातून बाहेर पडत नसताना आमदार अण्णा बनसोडे जनता दरबाराद्वारे जनतेची सेवा करत आहेत. सामाजिक आंतर राखत शासनाचे नियम पाळत घेत असलेल्या जनता दरबाराबद्दल मतदारसंघातील नागिरकांकडून आमदारांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये कोण्त्याही आमदाराने ह्या प्रकारे जनतेची सेवा केली नाही, ना कोणता इव्हेंट ना प्रचार, ना हायटेक प्रसिद्धी ह्या पासून २ हात लांब रहात जनतेत जाऊन सरळ जनसेवेवर भर दिला.

आगामी महापालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठीच्या हालचालींना वेग.

मात्र या सर्वांमध्ये आमदार बनसोडेंची कामगिरी सरस ठरत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचाल उत्साह संचारला आहे. परिणामी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सत्तांतर होईल, अशी दाट शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *