केंद्र सरकारच्या सुचनेनुसार आता ई पास बंधन रद्द. आता राज्य व आंतर राज्य प्रवास व माल वाहतुकीस परवानगी

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – पिंपरी चिंचवड – दि. २३ ऑगस्ट – केंद्र सरकारने कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन केले होते. आता सरकार हळूहळू निर्बंध शिथिल करत आहे. याच प्रक्रियेतून आता केंद्राने सर्व राज्यांना राज्यांतर्गत आणि दुसऱ्या राज्यातील लोकांच्या प्रवास आणि सामानाच्या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध घालू नये असे निर्देश दिले आहेत.

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले की, अशी माहिती आहे की विविध जिल्ह्यात आणि राज्यांद्वारे स्थानिक स्तरावर वाहतुकीवर बंदी घातली जात आहे. अनलॉक-3 च्या मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून देत भल्ला म्हणाले की, अशा निर्बंधांमुळे वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्यीय वाहतुकीस समस्या निर्माण होते आणि पुरवठा साखळीवर परिणाम होतो. यामुळे आर्थिक कार्य आणि नोकरीमध्ये अडथळा निर्माण होतो.

त्यांनी पत्रात म्हटले की, अनलॉकच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की व्यक्ती किंवा सामानांच्या अंतरराज्य आणि राज्यांमधील वाहतुकीवर बंदी असू नये. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की, शेजारील देशांशी केलेल्या कराराअंतर्गत, सीमेपलीकडील व्यापारासाठी व्यक्ती किंवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र परवानगी, मंजुरी किंवा ई-परमिटची आवश्यकता नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *