महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल ।। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकड्यांच्या नापाक कारनाम्याचा भांडाफोड झालाय… पाकड्यांनी पाकव्याप्त काश्मीरला दहशतवाद्यांचा अड्डा बनवल्याचं समोर आलंय…मात्र याच दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी भारताने फुलप्रुफ प्लॅन बनवलाय…एलओसीच्या पहिल्या टप्प्यात हेवी आर्टिलरी, सर्विलेंस आणि रडार सिस्टीम तैनात करण्यात आलीय..तर दहशतवाद्यांचे मुळं उखडून टाकण्यासाठी आणि क्रॉस बॉर्डर स्ट्राईकसाठी भारताने स्पेशल टीम तयार केलीय.. मात्र दहशतवाद्यांचे गड नेमकं कुठं आहेत? पाहूयात…
पाकिस्तानमध्ये 37 दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड आहेत. त्यापैकी 20 लॉन्चपॅड पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याची माहिती सुरक्षा एजेन्सीच्या हाती लागलीय.. तर पाकिस्तानमधील मुजफ्फराबादच्या अदब याजिद कॅम्पमध्ये पाकिस्तानी आर्मीने ट्रेनिंग दिल्याचं समोर आलंय.. यातूनच पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला..
पाक सैन्याकडून रावलकोटमध्ये दहशतवाद्यांचं संमेलन
जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबासह 15 संघटनांचे कमांडर सहभागी
मसूद अझहरने पहलगाम हल्ल्यासाठी दिली चिथावणी
नदीच्या आडून पाकिस्तान आर्मीच्या एसएसजी टीमकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण
प्रशिक्षण दिलेले 130 दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रीय
याच कुरापतखोर पाकड्यांना धडा शिकवण्याचा इशारा पंतप्रधान मोदींनी दिलाय..
आता दहशतवाद्यांचे कॅम्प उध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करुन चालणार नाही… कारण पाकिस्तानचं लष्कर हाच दहशतवाद्यांचा आका आहे… त्यामुळेच या दहशतवादाच्या रावणाला भस्म करुन भारताने पाकड्यांचा माज उतरवायला हवा.