वैभव सूर्यवंशी- हे नाव लक्षात ठेवा : 35 बॉलमध्ये 100 रन कसे केले?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ एप्रिल ।। राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात जायंट्सच्या संघांदरम्यान झालेला आयपीएलमधील 47 वा सामना फारच रंजक झाला. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने दमदार विजय मिळवत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. विशेष म्हणजे या विजयात राजस्थानच्या संघातील 14 वर्षांच्या वैभव सुर्यवंशीनं दमदार शकत झळकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यशस्वी जयस्वालनेही दमदार फटकेबाजी केली. या दोघांनी 166 धावांची सलामी दिल्याने राजस्थानच्या संघाला 210 धावांचं लक्ष्य सहज गाठता आलं.

सोमवारी मिळवलेल्या या विजयामुळे राजस्थानच्या संघ प्लेऑफ्सच्या स्पर्धेतून बाहेर जाण्यापासून थोडक्यात बचावला आहे. सध्या 17 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या आणि 35 बॉलमध्ये शतकी खेळी केली. या खेळीमध्ये वैभवने 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. वैभवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरबरोबरच युवराज सिंगनेही या 14 वर्षीय तरुण खेळाडूचं कौतुक केलं आहे.

सचिन काय म्हणाला?
सचिन तेंडुलकरने कालच्या सामन्यातील एक व्हिडीओ शेअर करत वैभवच्या खेळातील बारकाव्यांवर टीप्पणी केली आहे. “वैभवचा निर्भीडपणा, बॅटचा वेग, चेंडूची उसळी लवकर समजण्याची कला आणि चेंडूची गती ओळखून तिचा योग्य उपयोग करुन घेण्याची क्षमता या साऱ्या गोष्टींमुळेच त्याला एवढी सुंदर खेळी करता आला. याचा शेवट काय झाला तर त्याने 38 बॉलमध्ये 101 धावा केला. छान खेळलास!” असं सचिनने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केलं आहे.

युवराज सिंगकडून कौतुकाचा वर्षाव
दुसरीकडे युवराज सिंगही वैभवच्या खेळीने प्राभावित झाला असून तो सुद्धा सोशल मीडियावरुन व्यक्त झाला आहे. “वयाच्या 14 व्या वर्षी तुम्ही काय करत होता? हा मुलगा डोळ्याच्या पापणीची उघडझांपही न करता जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा समाचार घेतोय. वैभव सूर्यवंशी- हे नाव लक्षात ठेवा! तो ज्या निर्भीडपणे खेळतोय ते कौतुकास्पद आहे. पुढच्या पिढीत क्रिकेटपटूंना अशी कामगिरी करताना पाहून अभिमान वाटतो,” असं युवराजने म्हटलं आहे.

मला भीती वाटत नव्हती: वैभव सूर्यवंशी
या सामन्यानंतर बोलताना वैभवने मागील काही महिन्यांपासून मी ज्याचा सराव करत होतो तेच मी मैदानात जाऊन केलं. मला भीती वाटत नव्हतं. मी केवळ चेंडूवर लक्ष्य केंद्रित केलं आणि खेळत राहिलो, असं वैभवने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *