महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ एप्रिल ।। स्पेनच्या पावर ग्रीडमधून होणाऱ्या वीज पुरवठ्यात कपात करण्यात आल्याने संपूर्ण देशाची बत्ती गूल झालीय. स्पेनसह फ्रान्स आणि पोर्तुगालमध्ये वीज पुरवठा खंडीत झालाय. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर स्पेन पावर ग्री ऑपरेटर कंपनी रेड इलेक्ट्रॉनिक्सने सांगितलं की, ऊर्जा कंपन्यांच्या मदतीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
स्पेनमध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर ई-रीड्स, एक स्पॅनिश वीज ग्रिड मॉनिटरिंग कंपनीने सांगितलं की, संपूर्ण देशात योग्य आणि नियमितपद्धतीने वीजेचा पुरवठा करण्यात यावा यासाठी प्रयत्न केला जाईल. ही संपूण युरोप देशाची समस्या असल्याचंही कंपनीने सांगितलंय.
➡️ Activados planes de reposición del suministro eléctrico en colaboración con las empresas del sector tras el cero ocurrido en el sistema peninsular.
➡️ Se están analizando las causas y se están dedicando todos los recursos para solventarlo.
Seguiremos informando.
— Red Eléctrica (@RedElectricaREE) April 28, 2025
रस्त्यावर लोकांची गर्दी
स्पॅनिश रेडिओ स्टेशन्सनी सांगितले की माद्रिदमधील भूमिगत रस्ते रिकामे करण्यात आलेत. कॅडोर सेर रेडिओ स्टेशनने सांगितलं की, स्पेनची राजधानी माद्रिद शहराच्या मध्यभागी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रस्त्यांवर गोंधळ उडाला होता. रस्त्यांवरील लाइट्स बंद झालेत. अशा परिस्थितीत देशाच्या राजधानीतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. तर पोर्तुगाल पोलिसांनी यासंबंधी सांगितलं की, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे देशभरातील रस्त्यावरील लाइट्स बंद झालेत. याशिवाय लिस्बन आणि पोर्तोमध्ये मेट्रो सेवा देखील बंद करण्यात आलीय.