लालबाग परिसरात शुकशुकाट; केवळ विभागातील रहिवाशांना दर्शन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २४ ऑगस्ट -सार्वजनिक गणेश मंडळात भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी केवळ विभागातील रहिवाशांना गणेशदर्शन देण्यात येत आहे.

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी सांगितले की, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या चिंतामणीच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी होत असते, पण यंदा कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे चिंचपोकळीच्या चिंतामणीची देव्हाऱ्यातील चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून हे वर्ष जनआरोग्य वर्ष साजरे करण्याचा मंडळाने निर्णय घेतला आहे. चिंतामणी भक्तांसाठी आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडून देण्यात येणाºया सर्व सूचनांचे पालन करूनच या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

गर्दी होऊ नये म्हणून केवळ विभागातील नागरिकांना दर्शन देण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. त्यासोबत भाविकांचे तापमान तपासले जात आहे. निर्जंतुकीकरण केले जात आहे, असेही नाईक म्हणाले. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्लीने मुंबईच्या राजाची प्रतिष्ठापना केली आहे़ यंदा मंडळाचे ९३वे वर्ष असून कोरोना पार्श्वभूमीवर साधेपणाने उत्सव साजरा केला जात आहे. लोकमान्य टिळकांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आंदराजली देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी लोकमान्य टिळकांना समर्पित करणारी आरास केली आहे.

मोजक्याच भक्तांना दिले जाते दर्शन
मंडळाच्या दरवर्षी दोन मूर्ती असतात, एक उत्सव आणि दुसरी पूजेची मूर्ती. यंदा केवळ सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी मशीन लावण्यात आल्या आहेत. तसेच ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात येत आहे. दररोज मोजक्या भक्तांना दर्शनासाठी सोडले जात आहे. यामध्ये बाहेरचे भाविक नाहीत केवळ येथील भाविकांचा समावेश आहे. कोरोनामुळे आपण शांततेत उत्सव साजरा करत आहोत, पण कोरोनाचे सावट गेल्यावर पुढील वर्षी जल्लोषात गणेशोत्सव साजरा करू, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *