महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० एप्रिल ।। नवे शैक्षणिक वर्ष 16 जून सोमवारपासून सुरू होणार असून उन्हाळी सुट्टी 2 मेपासून तर विदर्भातील शाळा मात्र 23 जूनपासून सुरू होणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या सुट्ट्यांच्या नियोजनाची घोषणा गुरुवारी केली. सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना गुरुवार 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या लागतील. विदर्भाचे तापमान विचारात घेऊन या भागातील सुट्ट्या वाढवल्या आहेत.
विदर्भात राज्य मंडळाच्या शाळा 23 ते 28 जूनपर्यंत सकाळ सत्रात 7 ते 11: 45 आणि 30 जूनपासून नियमित शाळा सुरू करण्याचे निर्देश राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ.श्रीराम पानझाडे व प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.