हरवलेल्या ओळखींना एक सुंदर चेहरा देण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र 24: दिनांक 30 एप्रिल : देशातील अॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी व कर्करोगाने ग्रस्त रुग्णांबाबत समाजात जागरूकता, समावेश आणि उत्सवाचे वातावरण निर्माण करण्यासाठी कुसुमवत्सल्य संस्था मार्फत एका सेवाभावी फॅशन शोचे आयोजन करण्यात आला आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडितांनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या आघात, आव्हाने आणि निराशेला न जुमानता त्यातून बाहेर पडावे,” हा या शो च मुख्य हेतू आहे.
हा फॅशन शो 5 मे रोजी फोर्ट व्ह्यू रिसॉर्ट, खानापूर, पुणे येथे होणार असून यामध्ये द फेस ऑफ ब्युटी साठी रॅम्प वॉक, टॅलेंट राऊंड इ. राऊंड होणार आहे. फॅशन शो मिस्टर, मिस, मिसेस आणि कपल या कॅटेगरी असणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना, भरत नाट्य सादर होणार आहे तसेच कॅन्सरने पीडित महिलांना देखील आपली कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहेत. त्यातूनच समाजाला एक संदेश जाईल, की कॅन्सर असो की कोणताही रोग आपण त्यावर मात करू शकतो. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्य उपस्थितीत हा फॅशन शो होणार आहे.
संस्थेच्या सर्वेसेवा वैशाली पाटील म्हणाल्या की, “प्रत्येक मानवाला हास्य आणि यशाने भरलेले जीवन जगण्याचा अधिकार आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित हे तुमच्या आणि माझ्यासारखेच आत्मे आहेत, म्हणून उदारमतवादी समाजाच्या योगदानाद्वारे आमच्या व्यासपीठाद्वारे या हरवलेल्या ओळखींना एक सुंदर चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अधिक माहितीसाठी – +91 97647 89669 संपर्क साधावा.