![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० एप्रिल ।। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना अजून एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेत एप्रिल संपण्यापूर्वी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. मात्र, आज एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस आहे तरीही पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
आज ३० एप्रिल म्हणजेच अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार असं सांगितलं जात होतं. मात्र, अजूनही १५०० रुपयांच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. आज दिवसभरात कदाचित महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
जर महिलांच्या खात्यात आज पैसे जमा झाले नाहीत तर पुढच्या महिन्यात दोन्ही महिन्याचे हप्ते दिले जातील. म्हणजेच पुढच्या महिन्यात ३००० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडक्या बहिणी सध्या एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहे.
या महिलांना मिळणार नाहीत पैसे (These Women Will Not Get Money)
लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र असणाऱ्या महिलांच्याच खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. दरम्यान, अजून अर्जांची पडताळणी सुरु आहे. महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवून ही पडताळणी केली जाणार आहे. ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेची लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे. जर या निकषांमध्ये महिला पात्र असतील तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे,
