राज्यात पुढच्या 24 तासांमध्ये ऊन-पावसाचा मारा ; मे महिना कसे असेल ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ मे ।। एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागांना अवकाळी पावसाचा मारा सोसावा लागला ज्यामुळं हा एप्रिल महिना विचित्र हवामानाचा ठरला असं म्हणायला हरकत नाही. आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानाचे एकंदर तालरंग नेमके कसे असतील याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हा अंदाज अनेकांनाच धडकी भरवून गेला आहे. मे महिन्यातील हवामान अंदाजाआधी पुढच्या 24 तासांमध्ये वातावरण नेमकं कसं असेल हे जाणून घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं.

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये देशासह महाराष्ट्रातही विविध प्रांतांच्या भौगोलिक रचनांनुसार तिथं हवामानात बदल अपेक्षित आहेत. पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसासह गारपिटीचा इशारा असून, उत्तर आणि मध्य भारताला मात्र उकाडा सहन करावा लागणार आहे. दक्षिण भारतामध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरणामुळं तापमानात किंचित घट पाहायला मिळेल.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल तापमानाच दोन ते तीन अंशांची घट अपेक्षित आहे. मात्र दमट वातावरणामुळं उष्मा मात्र घाम फोडताना दिसेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांमध्येही सूर्याचा कहर सुरूच राहील. तर, मधूनच येणारी अवकाळीची सर गोंधळ उडवून जाईल. दिवसाचा उत्तरार्ध सुरू झाल्यानंतर मराठवाडा, विदर्भामध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, पुढच्या 2 ते 5 दिवसांसाठी येथील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान उष्ण आणि दमट असेल. तर, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या तुरळक सरींची शक्यता असल्याची बाब हवामान विभागानं स्पष्ट केली आहे. राज्याच्या उत्तर कोकणासह पूर्व विदर्भ वगळता उर्वरित जिल्हांमध्ये उष्णतेच्या लाटेसम परिस्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मे महिन्यात उन्हासोबतच पावसाचाही मारा…
मे महिना दमदार उन्हाळी पावसाचा असेल असा अंदाज या महिन्याच्या सुरुवातीलाच वर्तवम्यात आला आहे. असं असलं तरीही तापमान वाढीमुळं उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहणार आहेत. मे महिन्यात महाराष्ट्रासह मध्य भारत, दक्षिण भारतात भारतात उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उत्तर किनारपट्टी वगळता उर्वरित राज्यात उन्हाळी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *