महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ मे ।। जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोदी सरकारच्या काल मंगळवारी चार महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आणि पाकिस्तानमध्ये एकच गोंधळ उडाला. पाकिस्तानी मंत्री मध्यरात्री उठून भारत आपल्यावर हल्ला करु शकतो, असा दावा करत आहेत. भारताला पाकिस्तान इतका घाबरला आहे की, पाकिस्तानचा लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हा गायब झाला आहे, तो एका बंकरमध्ये जाऊन लपल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या कटात असीम मुनीरचे नावही समोर येत आहे. पाकिस्तानमध्येच त्याच्याविरोधात आवाज उठवला जात आहे. पत्रकारांपासून ते निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत, सर्वजण मुनीरवर टीका करत आहेत. मुनीरच्या प्रक्षोभक विचारसरणीमुळे पाकिस्तान अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. आता हा जनरल असीम मुनीर भारताच्या भीतीने बंकरमध्ये जाऊन लपल्याचं बोललं जात आहे.
जनरल मुनीरचा पॅटर्न अगदी जनरल झियाउल हकसारखा दिसतो. धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणे आणि भारतात अस्थिरता निर्माण करणे. १९८०च्या दशकात झिया-उल-हक यांनी काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी ‘ऑपरेशन टोपाक’ सुरू केलं होतं आणि आज मुनीर त्याच मार्गानं चालताना दिसत आहे, असं म्हटलं जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जनरल असीम मुनीर हा काश्मीर आमच्या गळ्यातील नस आहे असं म्हणताना समोर आलं आहे. आम्ही ते विसरणार नाही. यासाठी आपण तीन युद्धे लढली आहेत, असंही तो म्हणाला आहे. त्याच्या या विधानानंतरच, पहलगाम हल्ला झाला होता.
जनरल मुनीरचा पॅटर्न जनरल झियाउल हकसारखा दिसतो. धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणे आणि भारतात अस्थिरता निर्माण करणे. १९८०च्या दशकात झिया-उल-हक यांनी काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी ‘ऑपरेशन टोपाक’ सुरू केलं होतं आणि आज मुनीर त्याच मार्गानं चालताना दिसत आहे, असं म्हटलं जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जनरल असीम मुनीर हा काश्मीर आमच्या गळ्यातील नस आहे असं म्हणताना समोर आलं आहे. आम्ही ते विसरणार नाही. यासाठी आपण तीन युद्धे लढली आहेत, असंही तो म्हणाला आहे. त्याच्या या विधानानंतरच, पहलगाम हल्ला झाला होता.
