![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मे ।। पहलगाम हल्ल्याच्या तब्बल 15 दिवसांनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला. याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानकडूनही वारंवार हल्ला चढवला जात असून याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने हवाई क्षेत्रावर तात्पुरती बंदी घातली आहेत. यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली असून तुमची फ्लाइट देखील रद्द झाली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बुधवारी 7 मे रोजी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले गेले, ज्यामध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय सशस्त्र दलाच्या या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे.

याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील 24 विमानतळ बंद केले आहेत. म्हणजेच सध्या या विमानतळांवरून उड्डाणांवर बंदी घालतली गेली आहे त्यामुळे, अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तुमची फ्लाइट देखील यामध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला परतावा मिळेल की नाही? नियम काय आहेत तुम्हाला माहिती असले पाहिजे.
युद्धासारख्या परिस्थितीत फ्लाइट कॅन्सल झाली तर रिफंड मिळेल का?
युद्धसदृश परिस्थिती उद्भवली आणि उड्डाण कॅन्सल झाले तर, अशा परिस्थितीत तुम्हाला परतावा मिळू शकतो. देशातील सुमारे 24 विमानतळांवर उड्डाणे थांबवण्यात आली असून यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तुमची फ्लाइट देखील यामुळे कॅन्सल झाली असेल तर मग तुम्हाला परतफेड किंवा रिफंड मिळण्याचा अधिकार आहे.
नियमांनुसार, तुम्हाला कोणत्याही कॅन्सलेशन शुल्काशिवाय पूर्ण परतावा मिळाला पाहिजे कारण हा निर्णय विमान कंपनीने घेतला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांनुसार, विमान कंपनीच्या चुकीमुळे उड्डाण रद्द झाले. तर मग अशा परिस्थितीत प्रवाशाला संपूर्ण पैसे परत मिळतात पण, तुम्ही अधिक माहिती मिळवणासाठी एअरलाइन हेल्पलाइनवर कॉल करू शकता.
फ्लाइट कॅन्सलेशन रिफंडची प्रक्रिया काय
तुमची फ्लाइट रद्द झाली तर तुम्हाला एअरलाइनच्या वेबसाइट किंवा ॲपला भेट द्या. तिथे तुम्हाला रद्द केलेल्या फ्लाइट्स आणि रिफंड स्टेटस तपासा आणि तिथे तुम्हाला रिफंडची स्थिती दिसत नाही तर मग तुम्ही कस्टमर केअरला फोन करून माहिती घ्या. त्याचवेळी, तुम्ही थर्ड पार्टी साइटवरून तिकीट बुक केले असेल तर मग रिफंडसाठी तुम्हाला तिथे संपर्क साधावा लागेल. पण एअरलाइनने तुम्हाला परतफेड देण्यास नकार दिला तर त्यानंतर तुम्ही DGCA च्या अधिकृत वेबसाइट https://www.dgca.gov.in/digigov-portal/ ला भेट देऊन तक्रार करू शकता.